Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला उपाध्यक्ष प्रतिभा तावडे यांचा सत्कार

वरणगाव प्रतिनिधी । वरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे प्रतिभा तावडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला उपाध्यक्ष पद मिळाले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्याप्रसंगी बोलताना प्रतिभाताई तावडे यांनी आपल्या कार्य हे शरदचंद्र पवार यांच्या प्रेरणेतून व सुप्रिया सुळे यांच्या आशीर्वादाने गेल्या दहा ते बारा वर्षापासून एक सामान्य कार्यकर्ता व सामाजिक कार्य  करीत होते मला कुठलाही राजकीय वारसा नसताना आज पक्षाने दिलेली जबाबदारी फार मोठी आहे व ती सक्षम पणे निभावणार व महिलांच्या  अडचणी सोडवण्यासाठी मी तत्पर राहील अशी  भावना व्यक्त केली  पक्षाने मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल  सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. 

त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, माजी नगरसेवक सुधाकर जावळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस  जिल्हा उपाध्यक्ष वाय. आर. पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष समाधान चौधरी, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष कैलास माळी, माजी नगरसेवक रवी सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष प्रकाश नारखेडे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष मनोज कोलते, महेश सोनवणे,  इफ्तार खा मिर्झा, माजी नगरसेवक साजिद कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील, महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजना पाटील, माजी नगरसेविका प्रतिभा चौधरी, श्रद्धा गायकवाड, वैशाली सुरळकर व असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version