Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादीला खिंडार; ममुराबाद येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Gulab 1

धरणगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार ना. गुलाबराव पाटील यांनी आज तालुक्यातील चांदसर, चोरगाव व दोनगाव भागात प्रचार दौरा काढला होता. यावेळी जळगाव तालुक्यातील ममुराबाद राष्ट्रवादीचे ग्रा.पं. सरपंच, ग्रा.पं.सदस्य आणि विकासो चेअरमन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

 

धरणगाव तालुक्यातील तालुक्यातील पाळधी-बांभोरी प्र.चा. जि.प. गटातील चांदसर, कवठळ, चोरगाव, झुरखेडा, निमखेडा, धार, शेरी, पाथराडबु, वंजारी खपाट, पथराड खुर्द, बोरखेडा, पिंपळे सिम, दोनगाव बु, दोनगाव खुर्द, रेल, लाडली, फुलपाट, टहाकळी, आव्हाणी, भोकणी व सावखेडा या परिसरात उमेदवार गुलाबराव पाटील यांचा प्रचार दौरा काढण्यात आला.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
ममुराबाद सरपंच विलास सोनवणे, माजी सरपंच भरत शिंदे, महेश चौधरी, ग्रा.पं. सदस्य विजय शिंदे, पटेल प्रमोद, सय्यद मुल्लाजी, नबी मेम्बर, राहुल लाडके तसेच विकासो चेअरमन शरद पाटील, कैलास ढाके, राजाराम शिंदे, राहुल ढाके, आमोल चौधरी, प्रशांत इंगळे, विवेक बराटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

प्रचार दौऱ्यात यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे चांदसर सरपंच सचिन पवार, अशोक सोनवणे, शेरीचे सुधाकर पाटील, आबा पाटील, नंदलाल कुमावत, ज्ञानेश्वर पाटील, एमडी कुमावत, भिकन कोळी, धारचे सरपंच उत्तम सोनवणे, दीपक सावळे, सौरभ पाचपोळ, नारायण पाटील, पथराड शरद शिंदे, श्रीकांत चव्हाण, अमृत चाफे, दोनगावचे किशोर पाटील, सुरेश पाटील, राहुल पाटील, भाऊसाहेब पाटील, झुरखेडाचे दामु पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जीवन पाटील, रेलचे पंडित पाटील, गोपाल पाटील, गजानन पाटील, आव्हाणीचे विठोबा पाटील, भरत पाटील, लाडलीचे सुनील पाटील, भगवान पाटील गोपाल जिभाऊ, भोकणी चे भुषण पाटील, नरेंद्र पाटील, बांभोरी प्र.चा.चे गोपाल नन्नवरे, रवींद्र नन्नवरे, नामदेव शेठ, सरपंच हरिभाऊ पाटील, भिमसिंग पाटील, सुनिल पाटील, चोरगावचे ज्ञानेश्वर सोनवणे, महेश पवार, कैलास सोनवणे, दशरथ सोनवणेझ यांच्यासह या परिसरातील शिवसेना-भाजपा युवासेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version