Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराची आज बैठक;

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीच्या निकालात अपयशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने गुरुवारी आमदारांची बैठक बोलाविली आहे. पक्षाचे काही आमदार शरद पवार गटात परण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला किती आमदार हजेरी लावतात याची उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने केवळ चार जागा लढवल्या होत्या. पक्षाला रायगड ही एक जागा जिंकता आली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. महायुतीच्या घटक पक्षाची मते राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्राप्त झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. या सर्व बाबींची चर्चा आमदारांच्या बैठकीत करण्यात येणार आहे. लोकसभेचे मतदार संपल्यानंतर राष्ट्रवादी आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. विधानसभेत राष्ट्रवादीचे ५३ आमदार होते. त्यापैकी ४३ आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली. अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतण्याच्या वाटेवर आहेत, असे विधान शरद पवार गटाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे

Exit mobile version