Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एन.सी.सी.च्या कॅडेट्स यांची जैन हिल्सला दिली भेट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  NCC म्हणजे राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स. NCC ही भारतातील युवा लष्करी संघटनांपैकी एक आहे. तरुणांमध्ये सैन्याविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि त्यांनी लष्करी स्तरावर तयार व्हावे, यासाठी एनसीसीची स्थापना करण्यात आली आहे. NCC हे भारताच्या तिन्ही सैन्यदल, नौदल, लष्कर आणि हवाई दलाशी संबंधित आहे.

 

देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते. त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणे हाच संघटनेचा उद्देश आहे. NCC चे मुख्य विधान “एकता आणि शिस्त” आहे. हे NCC ची मूल्ये दर्शवते. 18 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.च्या १०० कॅडेट्स (५० युवक व ५० युवती) यांनी औद्योगिक प्रशिक्षण अंतर्गत जैन हिल्सला मंगळवार दिनांक ०८ व ०९ जुलै २०२३ रोजी भेट दिली. या दरम्यान फ्युचर फार्मिंग, कोर्पोरेट प्रोफाइल, श्रद्धा धाम या स्थळांना भेट देण्यात आली.

 

यावेळी लेफ्टनंट कर्नल पवन सिंग, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, प्रितम शिंदे, सुभेदार मेजर प्रेम सिंग, कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत, सेकंड ऑफिसर नारायण वाघ, हवालदार अमोल साळुंखे उपस्थित होते.

Exit mobile version