Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धनाजी नाना महाविद्यालयात नवरात्र महोत्सव

dhanaji clg 1

फैजपूर प्रतिनिधी । येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील कौशल्य विभाग आणि कन्हैया कॉम्प्युटर भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रनिमित्त विविध स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

याबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना फक्त तंत्रज्ञानाचे शिक्षण न देता इतरही क्षेत्रात आपले विद्यार्थी खंबीरपणे उभे राहावेत, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवा या उद्देशाने आमच्या स्किल सेंटरच्या वतीने नवरात्रीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केल्याचे केंद्राचे संचालक दिपाली महाजन यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक मिलन महाजन, व दिपाली महाजन मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी याप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिंनी सांगितले की, स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी आज पदवी शिक्षणासोबतच इतर कौशल्य घेणे गरजेचे आहे. आणि त्यासर्व बाबींचा विचार करून आपल्या महाविद्यालयामध्ये विविध करियर ओरिएंटेड कॉम्प्युटर कोर्सेस आणि ब्युटी पार्लर कोर्सेस सुरू केलेले आहे. फक्त विद्यार्थ्यांना जॉब मिळावा विद्यार्थी कोठेही कमी पडू नये, त्यांच्या कलागुणांचा सर्वांगीण विकास व्हावा, हाच या मागील उद्देश, म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्यावा, आणि आपला आत्मविश्वास वाढवा, असा मोलाचा सल्ला प्राचार्य.पी.आर.चौधरी यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Exit mobile version