Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर

पाचोरा, प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण महिला सखी मंचद्वारे जळगाव जिल्हा महिला सखी मंच अध्यक्ष मनिषा पाटील व महाराष्ट्र राज्य यांनी निसर्ग व पर्यावरण महिला सखीमंच पाचोरा तालुका कार्यकारणी जाहीर केली आहे.

या निसर्ग व पर्यावरण महिला सखी मंच पाचोरा तालुका कार्यकारणीत अध्यक्षपदी उज्वला देशमुख (महाजन), उपाध्यक्षपदी पुष्पलता पाटील, कार्याध्यक्ष सुवर्णा महाजन, सचिव ज्योती महालपूरे, सहसचिव सिमा पाटील, कोषाध्यक्ष आशा राजपूत, सहकोषाध्यक्ष मिना हिवरे, संघटक कुमुदिनी पाटील, सहसंघटक चारुलता पाटील, कायदेविषयक सल्लागार छाया चौधरी, विजया पाटील, स्वाती महाजन, तज्ञ मार्गदर्शक प्रतिभा पाटील, मनीषा वाणी, सल्लागर सदस्य कविता पाटील, सीमा देवराम पाटील, सुषमा गोसावी तसेच कार्यकारणी सदस्य ज्योत्स्ना चित्ते, वंदना सोनवणे, सीमा देशमुख, शामल सुशलादे, सीमा झवर, महाविद्यालयीन प्रमुख मनीषा पाटील यांची निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल सर्व महिला भगिनींचे महाराष्ट्र राज्य निसर्ग व पर्यावरण सखी मंचच्या कार्याध्यक्ष अरुणा मुकुंदराव उदावंत व जिल्हाध्यक्ष मनीषा पाटील, तसेच जळगाव जिल्हा कार्यकारिणीत सहभागी असलेल्या पाचोरा तालुक्याच्या महिला शिक्षिका अमृतराव पाटील, गायत्री पाटील, प्रतिभा उबाळे, छाया चौधरी यांनी नवीन कार्यकारणीचे अभिनंदन केले.

निसर्ग सृष्टीतून आपल्याला मोफत मिळत होत्या त्या गोष्टी आपल्याला विकत घ्यावे लागत आहे. याची कुठेतरी आपण दखल घेतली पाहिजे. निसर्गातून मिळणाऱ्या पाण्याचा स्त्रोत कमी होतोय आणि आपल्याला पाणी विकत घ्यावे लागत आहे. तरीही आपण जागे झालो नाही. मात्र आता याच काळात लक्षात येणारी प्रकर्षाने गोष्ट म्हणजे आपल्याला ऑक्सिजन देखील विकत घ्यावा लागला म्हणून ऑक्सिजन हा ज्या झाडांपासून आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतो व तशी ऑक्सिजन पूरक झाड लावण्याचा संकल्प सर्व महिला सखी मंच यांनी घेतलेला आहे. आणि त्यातूनच या निसर्ग व पर्यावरण सखी मंच कार्यकारिणीची स्थापना करण्यात आलेली आहे. तालुक्यात यावर्षी निसर्ग व पर्यावरणसाठी मंचच्या माध्यमातून भरपूर ऑक्सिजन देणारी वड, पिंपळ, निम यासारखी झाडे लावण्याचा हीच समिती संकल्प करीत आहे.

Exit mobile version