Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व जिल्हा डॉ.सेलतर्फे पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी

jalgaon 4

जळगाव प्रतिनिधी । येथील जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील व जिल्हा डॉक्टर्स सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील यांच्या सहकारी टिम गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर-सांगली पुरग्रस्तांची आरोग्य तपासणी करत आहे.

याबाबत माहिती अशी की, नुकसान झालेल्या गावामध्ये मदत पोचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. जसे इस्लामपूर परिसरातील साटपेवाडी, गौंडवाडी, बनेवाडी, मसुचीवाडी, फार्णेवाडी, बोरगाव या गावात जाऊन मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. याचबरोबर, जि.कोल्हापुर ता.कागल मधिल महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील सुंळकुड, लिगंनूर, शंकरवाडि या गावात ही सेवा पुरविण्यात आली. त्या वेळेस गावातील काही भागात पाणी होते. मात्र, कॅम्प लावल्यावर रूग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहूण माझ्या सहकार्याचा थकवा निघुन जात असे. भडगाव येथिल आशिर्वाद हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमंत पाटिल, डॉ.अजय वाघ, राकेश मराठे हे त्या-त्या गावातील सरपंच उपसरपंच युवक मंडळीच्या उपस्थित औषधोपचार करीत होते. ‘काळ कसोटीचा आहे पण वारसा संघर्षाचा आहे.’ ‘लढेंगे, जितेंगे’ असे म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेस व जिल्हा डॉक्टर्स सेल सांगली-कोल्हापूरकरांसोबत नेहमीच सोबत असल्याचे ते म्हणाले. शेवटी आशिर्वादाची शिदोरी घेऊन परत निघाले.

Exit mobile version