Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहिर

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची कार्यकारिणी जाहिर करण्यात आली, यात जळगाव शहरातील मोहम्मद इन्जार मसुद अहमद खान, झिशान अहमद इस्तीयाक अहमद शेख आणि अदनान शरिफ खान यांची निवड करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद पवार यांच्या विचारांचा वसा घेवून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील तसेच महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. कार्यकारिणीत जळगाव शहर संघटकपदी अदनान शरिफ खान, जिल्हा शहर महानगर चिटणीसपदी मोहम्मद इन्जार मसुद अहमद खान, झिशान अहमद इस्तीयाक अहमद शेख यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांच्या निवडीबददल सर्वत्र आनंद व्यक्‍त करत असून मुस्लीम समाजात अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे

 

Exit mobile version