Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मलकापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा संपन्न

मलकापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघातुन श्रीरामदादा पाटील यांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिका-यांनी जास्तीत-जास्त परिश्रम घ्यावे. दिवस कमी असल्याने स्वता: उमेदवार समजून गाव-पातळीवर प्रचार करण्याचे अवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांनी मलकापुर येथील पदाधिकारी कार्यकर्ते मेळाव्यात केले.

लोकसभा निवडणूक नियोजन मेळावा मलकापुर शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयात मेळावा संपन्न झाला यावेळी नांदुरा-मलकापुर मतदारसंघाचे आमदार राजेश ऐकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाराष्ट्रा सरचिटणीस संतोष रायपुरे यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की रावेर लोकसभा मंतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना नांदुरा व मलकापुर तालुक्यातुन जास्तीत-जास्त लीड देण्याचा निर्धार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हा कार्यध्यक्ष अॅड अशोक सुरडकर,माजी नगराध्यक्ष राशिद खान जमादार, राष्ट्रवादी महीला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ वनीताताई गायकवाड,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष मोहन पाटील,राष्ट्रवादी महीला जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट नरेश शेळगे, मलकापुर राष्ट्रवादी शरदपवार गट तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी, मलकापुर शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष मलकापुर दिपक चोमारे पाटील, मलकापुर कॉग्रेस तालुकाध्यक्ष बंडू चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव तायडे,राष्ट्रवादीचे अरुण अग्रवाल, कॉग्रेस पक्षाचे राजू पाटील शिवसेनाचे गजानन ठोसर, माजी नगराध्यक्ष हरीश रावळ, अल्पसंख्या तालुकाध्यक्ष लखनभाई कुरेश, माजी नगर सेवक अनिल गांधी, राष्ट्रवादी उषाताई वनारे आदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना (उबाठा) व कॉग्रेस पक्षाचे मलकापुर तालुक्याचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version