Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात राष्ट्रीय युवा दिन साजरा

पाचोरा प्रतिनिधी । राष्ट्रमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त येथील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनानी शरद गीते संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत पाचोरा यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पूजन व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊच्या प्रतिमेस पूजन व पुष्पहार डॉ. अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष यांचे हस्ते अर्पण करून दीपप्रज्वलन केले तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार चिंधू मोकळ तालुकाध्यक्ष व क्रांती ज्योती सावित्रिबाई फुले यांचे प्रतिमेस कृषी समिती प्रमुख डॉ. एन. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ ह्या स्वातंत्र्य, स्वराज्य विचारांचे प्रेरणा होत्या आजही चारशे वर्षां नंतरही तेवढेच प्रेरणादायी आहेत असे गौरवद्गार डॉ. अनिल देशमुख जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत जळगाव व आजचा विश्र्व्यापक व स्वालंबी विचारांचे समर्थक स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण राष्ट्रीय युवा दिंन म्हणून व स्री शिक्षण च्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचेही प्रतिमा पूजन करून आजच्या युगात ही महिला सबलीकरण किती महत्वाचे आहे असे प्रतिपादन डॉ. अनिल देशमुख यांनी केले.

यानंतर सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनचे सचिव राजेंद्र पाटील, तालुका संघटक शरद गीते, स्वप्निल पाटील, संजय पाटील, कन्हैया देवरे आदी पदाधिकारी व सदस्य यांनीही प्रतिमा पूजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, तालुका अध्यक्ष चिंधू मोकळ, तालुका संघटक शरद गीते, कृषी समिती प्रमुख डॉ. एन. आर. पाटील, स्वप्नील पाटील, कन्हैया देवरे, संजय पाटील आदी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष चिंधु मोकळ यांनी केले.

Exit mobile version