Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

जळगाव प्रतिनिधी | डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य, डॉ.पी.आर.सपकाळे तसेच नोडल अधिकारी डॉ.ललीत जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक साक्षरता मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला.

नवमतदारांमध्ये जागृती तसेच निवडणूक प्रक्रियेसह मतदार नोंदणी कार्यक्रमाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.पी. आर. सपकाळे तसेच नोडल अधिकारी डॉ. ललीत जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक साक्षरता मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.

सर्व प्रथम प्रवेशित विद्यार्थी, राष्ट्रीय स्वयंसेवक तसेच कार्यक्रमास उपस्थीत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांकडून शपथ घेण्यात आली . तसेच महाविद्यालयातील सहाव्या व आठव्या सत्राचे विद्यार्थी शुभम म्हस्के, सागर पोखरकर, कृतिका हरणे, अभिजीत गव्हाणे यांनी मतदार नोंदणी करावयाची माहिती, मतदानाचे महत्त्व अशा वेगवेगळ्या विषयावर प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थांना माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version