Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल येथे राष्ट्रीय गणित दिवस साजरा

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय गणित दिवसा निमित्त गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएससी स्कूलमध्ये मध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, गणित रांगोळी स्पर्धा, गणित विश्लेषण तसेच गणिताप्रती सर्वांनाच अभिरुची वाढावी यासाठी हा दिवस इतक्या मोठ्या पातळीवर साजरा केला गेला.

राष्ट्रीय गणित दिन हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस असून आजच्याच दिवशी महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला होता. जगभरात हा दिवस ’गणित दिन’ म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी फक्त फक्त गणितालाच वेगळी ओळख दिली नाही, तर त्यांनी अशी काही प्रमेय आणि सूत्र दिली ज्यांचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि जे बरेच फायद्याचे ठरतात.

दरवर्षी २२ डिसेंबरला देश रामानुजन यांच्या योगदानाची आठवण काढतो. त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, नंबर थिअरी, गणिती विश्लेषण या सार्‍याची सर्वांनाच माहिती दिली. गणित क्षेत्रात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि महावीर यांच्यासह रामानुजन यांचंही नाव घेतलं जातं. अतिशय झपाट्यानं नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी झोकून देणार्‍या नव्या पिढीचा गणिताकडे कल वाढवणं हा त्यामागचा मुख्य हेतू आहे.

Exit mobile version