Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

न्यायालयाच्या आवारात शनिवारी होणार राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यांच्या ठिकाणी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजित करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये १२ हजार ७८२ प्रलंबित तर ३२ हजार ७९० वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस.पी. सैयद यांनी दिली.

लोकअदालतच्या आयोजनासंदर्भात बुधवारी पत्रकार परिषद झाली, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे एम.क्यू.एस.एम.शेख यांच्या अध्यक्षतेखाली लोकअदालतीस प्रारंभ होईल. याप्रसंगी जिल्हा वकील संघ अध्यक्ष, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त उपस्थिती राहणार आहे.

मोटार वाहन ट्राफिक चलन, भूसंपादन धनादेश, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युन्सिपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित खटले व दाखल पूर्व प्रकरणे तसेच एकूण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच येथील तडजोड योग्य प्रकरणे देखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली काढले जाणार आहे.  ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवायचे असतील त्यांना सुध्दा संधी देण्यात आली आहे. ऑनलाईन पध्दतीने सुध्दा पक्षकार लोकअदालतीमध्ये सहभागी होवू शकता. तर ई-मेलद्वारे सुध्दा प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवू शकणार आहेत.

 

Exit mobile version