Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय महामार्गावर सायकलला दुचाकीची धडक; महिला किरकोळ जखमी

apghat news

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग सायकलने रस्ता ओलांडत असतांना धावत्या दुचाकीसमोर आल्याने सायकलवरील महिला गंखमी झाल्याची घटना आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या महिलेला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहर वाहतूक पोलीसांनी रहदारी दुर केली.

याबाबत माहिती अशी की, मनिषा दिपक पाटील रा. जळगाव ह्या सायकलीने राष्ट्रीय महामार्गजवळील लाडवंजारी मंगल कार्यालयाकडून मेन रोडवर आल्या. त्यावेळी त्यांनी रस्ता ओलांडत असतांना आकाशवाणी चौकाकडून भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच 19 डीएच 4685 समोर आल्याने सायकलला जोरदार धडक दिली. यात यात मनिषा पाटील यांना हाताला किरकोळ जखम झाली आहे. तर दुचाकीवरील विद्यार्थी आश्विनी नेमाडे रा. चिनावल देखील किरकोळ जखमी झाले आहे. दुचाकी चालक ही विद्यार्थींनी चिनावल येथे मैत्रिणीसोबत जळगावात दुचाकीने आल्या होत्या. आज दोघींचा एमबीचा परीक्षा असल्याने परीक्षा देवून त्या पुन्हा चिनावल येथे जात असतांना हा अपघात झाला. दरम्यान सायकलचे देखील नुकसान झाले आहे. रस्त्यावर घटना झाल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी तातडीने धाव घेवून जखमी महिलेस खासगी रिक्षात उपचारासाठी रवाना केले व रस्त्यावरील राहदारी कमी केली. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version