Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा विद्या प्रसारक महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जनजागृती परिसंवाद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बारावी प्रवेशित व पदवी अंतिम वर्षातील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जनजागृती करणे व अंमलबजावणी करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. जगदीश पाटील (अधिष्ठाता, मानव्य विद्या शाखा क.ब. चौ. उ.म.वि जळगाव) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमाचे उपयुक्तता तत्वे कौशल्ययुक्त ज्ञानावर आधारित आहेत. समाज हा त्यामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जबाबदारीची जाणीव मानवी हक्क जोपासण्याचे काम करावे. कौशल्य युक्त शिक्षण हे आज काळाची गरज बनली आहे.

त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, चिकित्सक वृत्ती सजग आवश्यक आहे. आज विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात जगाचा ध्यास घेत शिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी ५+३+३+४ ही शिक्षण प्रणाली आकारली आहे. तसेच आज भारतामधल्या कोणत्याही विद्यापीठात, महाविद्यालयात शिक्षण घेता येऊ शकते आणि ते नोकरीसाठी ग्राह्य धरले जाऊ शकते, याआधी अशी सुविधा नव्हती असे नमूद करताना डॉ. पाटील यांनी कोठारी आयोग, राधाकृष्णन समिती, वर्धा शिक्षण समिती या शैक्षणिक धोरणातील माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी नवीन शैक्षणिक धोरण २०२० बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की बदल हा क्षणिक असतो परिवर्तन हे शाश्वत असते. आज ज्ञानावर आधारलेला समाज वर्ग आहे. विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्ये आधारीत शिक्षणासाठी महत्त्वाच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. बारावीनंतर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आपल्या पध्दतीने कोणताही विषय निवडू शकतात. तीन वर्षे बी. ए. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संशोधनाला विशेष स्थान दिले आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा रावते यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला किनगाव महाविद्यालयातील प्रा. संपत पावरा, प्रा. हारून तडवी, प्रा. सरला बारी तसेच यावल महाविद्यालयातील  डॉ. हेमंत भंगाळे,  डॉ. सुधीर कापडे, डॉ. प्रल्हाद पावरा, प्रा. संजिव कदम, प्रा. मनोज पाटील, प्रा, अरुण सोनवणे, प्रा, सी.के. पाटील उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कामडी, प्रा‌.अर्जुन गाढे, प्रा. नंदकिशोर बोदडे,प्रा.छात्रसिंग वसावे, प्रा.नरेंद्र पाटील,डॉ. निर्मला पवार, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा. रजनी इंगळे मिलींद बोरघडे, प्रमोद कदम यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वितरण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे अधिकारी प्रा. आर.डी.पवार यांनी मानले .

Exit mobile version