Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय काँग्रेस पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार – डॉ. जगदिश पाटील

बोदवड प्रतिनिधी । नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या काही दिवसांत होणार असून राष्ट्रीय काँग्रेस पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार, असे प्रतिपादन डॉ.जगदिश पाटील यांनी केले. बोदवड येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोदवड नगरपंचायत निवडणुकीत काही दिवसांवर येऊन ठेपली असून विविध पक्षांनी बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आज बोदवड शहरात राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जनता राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या सोबत असून यावेळी संपूर्ण प्रभागात राष्ट्रीय काँग्रेस पार्टी उमेदवार देणार असून सर्व जागा आम्ही स्वबळावर लढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.जगदिश पाटील यांनी सांगितली.

यावेळी जामनेरचे शंकर राजपूत, अमळनेरचे नगरसेवक मनोज पाटील, माजी सभापती विरेद्रसिंग पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, नगरसेवक डॉ.सुधीर पाटील, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भारत पाटील, पुरूषोत्तम पाटील, दिलीप पाटील, राष्ट्रीय काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष विनोद मायकर, काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष मेहबूब शेख, मनुरचे सरपंच सुभाष देवकर, अशोक तायडे, शांताराम मोरे, मनुरचे सागर पाटील, सुरेश कोळी, मुक्ताईनगरचे राजेंद्र जाधव यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Exit mobile version