Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केसीईच्या इंजिनिअरींग व मॅनेजमेंटतर्फे नॅशनल कॉन्फरन्स

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केसीईच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट तर्फे ‘एनईपीच्या धोरणानुसार उच्च शिक्षणात गुणवत्ता वाढ व्हावी या विषयाच्या अनुषंगाने एक दिवसीय नॅक स्पॉन्सर्ड नॅशनल कॉन्फरन्स यशस्वीरीत्या पार पडली गेली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डिबाटु, लोणेरेचे रजिस्ट्रार डॉ.बी. एफ. जोगी होते. या कार्यक्रमाचे उदघाटन डी.टी. ई.  नासिक विभागाचे जॉईंट डायरेक्टर डॉ. गोरक्ष गर्जे यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ.बी. एफ. जोगी यांनी एन ई पी धोरणाची कश्या पद्धतीने अंमलबजावणी करण्यात यायला पाहिजे या बद्दल मार्गदर्शन केले तर  डॉ. गोरक्ष गर्जे यांनी एन ई पीची मूलतत्त्वे आणि  वैविध्य पूर्ण शिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांचा समग्र विकास यावर मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्य वक्ते एन ई पी तांत्रिक शिक्षण अंमलबजावणी सदस्य भरत अमळकर यांनी उच्च आणि तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांकडून एन ई पीच्या अंमलबजावणीनुसार गुणवत्ता वाढ कशी करता येईल यावर भाष्य केले. त्यांनी, मॅकालेच्या शिक्षण पद्धतीने भारतात केवळ कारकून घडविले असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक व्यावहारिक प्रशिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालयांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले.

उच्च शैक्षणिक संस्थांनी एनईपी धोरणांची अंमलबजावणी करून उच्च आणि तांत्रिक शिक्षणात गुणवत्ता वाढ करावी या उद्देशाने भरवल्या गेलेल्या या कॉन्फरन्स मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून संशोधकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अनेक शोध प्रबंध सादर केले. संस्थेच्या अकॅडमीक डीन डॉ.प्रज्ञा विखार या कॉन्फरन्सच्या संयोजक होत्या तसेच डीन ऍडमिनिस्ट्रेशन डॉ. श्रीकांत तारे, व डीन रिसर्च डॉ. दिलीप हुंडीवाले यांची यात विशेष भूमिका होती. प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी सर्व संशोधकांना शुभेच्छा दिल्या, तसेच एन ई पीच्या धोरणाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी हा कार्यक्रम घेतला जावा असा विशेष आग्रह घ्यावा के सी ई सोसायटीचे अध्यक्ष एन. जी. बेंडाळे यांचा होता. प्रा. मधुलिका सोनवणे  यांनी संशोधकांच्या शोध निबंधांची वाखाणणी केली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राहुल पटेल, प्रा. प्रवीण भंगाळे, प्रा.के. बी. पाटील, प्रा. कल्पेश महाजन, प्रा.दर्शन ठाकूर, प्रा. अविनाश सूर्यवंशी, प्रा. वीणा भोसले, प्रा. लीना वाघुळदे, प्रा. रवींद्र स्वामी, प्रा. राजेंद्र वाघुळदे, प्रा. सचिन नाथ, प्रा.हेमंत धनंधारे यांची मोलाची भूमिका होती. सूत्र संचालन प्रा. शेफाली अग्रवाल आणि प्रा. हर्षा देशमुख यांनी केले

Exit mobile version