Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजातर्फे वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

koli samaj news

जळगाव प्रतिनिधी । येथील श्री माता मनुदेवी बहुउद्देशिय संस्था आणि रज्ञष्ट्रीय आदिवासी कोळी समाज संघटनांच्या वतीने राष्ट्रीय आदिवासी कोळी समाज वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शहरातील सरदार वल्लभभई पटेल भवनात करण्यात आले आहे.

यावेळी कार्यक्रामाचे अध्यक्षपदी राज्याचे कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रमेश पाटील, आमदार लताताई सोनवणे, माजी राज्य मंत्री गुलाबराव पाटील, आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री सुरेश जैन, गुलावराव देवकर, आमदार राजूमामा भोळे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंदूलाल पटेल, महापौर सिमाताई भोळे, आमदार चंद्रकात पाटील, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष यांच्यासह मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास समस्त कोळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version