Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाशिक येथे आदिवासी प्रकल्पविभागीय आढावा बैठक संपन्न

nashik aathava baithak

यावल प्रतिनिधी । नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री अशोकराव उईके यांच्या अध्यक्षतेखाली (दि. ३ जुलै) रोजी, दुपारी २ वाजता प्रकल्पविभागीय आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आदिवासींच्या विविध योजने संदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, नाशिक येथील शासकीय विश्रामभवन, येथे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आढावा बैठक संपन्न झाली, या आढावा बैठकीत राज्य शासनाच्या वतीने राज्यातील विविध आश्रमशाळा आणि वस्तीगृहांवर तसेच आदिवासी शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्यात येत आहे. याची सविस्तर माहिती प्रत्यक्ष त्या आदीवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह, आश्रमशाळा, आणि आदीवासी शेतकरी बांध बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत विविध शासकीय योजना पोहोचत आहे किंवा नाही या सर्व विषयांवर शासकीय विभागातील जिल्हास्तरीय प्रकल्प अधिकारी यांनी आदिवासी पाडयांवरील शेतकरी, आदिवासी आश्रमशाळा, वस्तीगृहांवर जावुन जिल्हास्तरीय बैठका घेवुन शासनाने आदीवासी बांधवांसाठी पाठविलेल्या निधीचा कशा प्रकारे विनियोग करण्यात येत आहे. याची संपुर्ण तपशिलवार माहिती संकलित करून योजनांचा अंमलबजावणीचे सर्वक्षण करण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहे. या आदिवासी विभागीय आढावा बैठकीत आदिवासी विभागाचे आयुक्त यांच्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, वाशिक जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी प्रामुख्याने उपस्थितीत होते. त्याचबरोबर आदिवासी विभागातील प्रकल्प स्तरीय नियोजन समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्ष मिना तडवी, समितीच्या जिल्हा सदस्य प्रज्ञा सपकाळे, सदस्य शांताराम भिल्ल, सदस्य नादान पावरा व जळगाव जिल्हयाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी सहभाग घेतला.

Exit mobile version