Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किनगाव येथे श्रीमद् भागवत महापुराण कथेची सांगता

यावल प्रतिनिधी । किनगाव येथील बऱ्‍हाणपूर अंकलेश्वर महामार्गालगत असलेल्या व्यंकटेश बालाजी इंटरप्राईजेस संचलित व्हि.मार्ट प्रांगणात गेल्या ७ दिवसांपासून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत महापुराण कथा वाचन सप्ताहाची आज (दि.६) रोजी दुपारी १ वाजता ह.भ.प.भाऊराव महाराज पाटील सेवानिवृत्त प्राचार्य मुक्ताईनगर यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली आहे.

दरम्यान, तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे चेअरमन व श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पंढरपुरचे अध्यक्ष ह.भ.प.विजयकुमार पाटील यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताहादरम्यान ह.भ.प.शब्दप्रभु श्री.पोपट महाराज कासारखेडा यांनी श्रीमद् भागवत महापुराण कथेचे वाचन केले. या कार्येक्रमाचे आयोजन स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशन चे अध्यक्ष, गाँडस्मिथ चँरीटेबल ट्रस्टचे संचालक इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूल चे सचिव मथुराई गोवर्धन गोशाळा तथा श्री संत तुकाराम महाराज बहुउद्देशीय संस्था पंढरपूर व्हि.मार्टचे संचालक किनगाव विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक व यावल तालूका मराठा समाजाचे उपाध्यक्ष मनिष पाटील यांच्या माध्यमातुन करण्यात आले होते, तर या किर्तन सप्ताहाच्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी परीसरातील नागरिक सर्व सामाजीक कार्येकर्ते मंडळांचे पदाधिकारी यांचे या कार्येक्रमाला महत्वाचे सहकार्ये लाभले.

 

Exit mobile version