Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जी. एम. फाऊंडेशनच्या आरोग्यसेवेवर पंतप्रधान मोदी यांची कौतुकाची थाप

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या जी. एम. फाऊंडेशनने कोविडच्या आपत्तीत केलेली सेवा आणि विशेष करून कोरोना लसीकरणासाठी केलेल्या अविरत सेवेचे कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. फाऊंडेशनला पाठविलेल्या विशेष पत्रात त्यांनी महाभयंकर आपत्तीत केलेल्या सेवेचे तोंड भरून कौतुक केले आहे.

माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन हे त्यांच्या आरोग्यसेवेची संपूर्ण राज्यभरात ख्याती आहेत. अगदी कोणत्याही विकारांवर गरीबातील गरीब रूग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी ते अग्रेसर असून त्यांच्या आरोग्यदूतांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून ही सेवा अव्याहतपणे सुरू आहे. यातच कोविडच्या आपत्तीमध्ये जी.एम. फाऊंडेशनने अतिशय कौतुकास्पद असे काम केले आहे. कोविडच्या वैश्विक महामारी मध्ये अतिशय भयावह वातावरण असतांना आमदार गिरीश महाजन यांनी कोविड रुग्णांना सेवेसाठी रायसोनी कालेज येथे साडेतीनशे बेड चे कोविड रुग्णालय सुरू केलं होते. या कोविड रुग्णालयाचा अनेकांनी लाभ घेतला. या कोविड रूग्णालयात आ. गिरीश महाजन यांनी स्वत: अनेकदा भेट देऊन आरोग्यसेवेची पाहणी केली होती हे विशेष.

जी.एम. फाऊंडडेशनने लसीकरणातही महत्वाची भूमिका बजावली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा महा कुंभ घेऊन एका दिवसात अकरा हजाराहून अधिक लोकांचं लसीकरण केलं होतं याशिवाय सेवा समर्पण अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ५० प्लस ठिकाणी लसीकरणाचे उपक्रम राबवून उच्चांक निर्माण केला होता त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली. जळगाव शहर व जामनेर तालुकाच नव्हे तर जिल्ह्यात ठिकठिकाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून कोविड लसीकरण अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. तर आधी देखील फाऊंडेशनने जिल्ह्यात अनेक आरोग्य महाशिबिरे घेतली असून याचा लक्षावधी रूग्णांना लाभ झाला आहे.

जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने राबविलेला 11000 हजार प्लस महाकुंभ या जळगाव जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या मदतीने व्हॅक्सिनेशन शिबिर राबविले होते आमदार गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर तालुक्यात सुद्धा जामनेर शहरासह तालुक्यातील शेंदुर्णी, पहूर, फत्तेपूर, तोंडापूर आदींसह महत्वाच्या सर्व गावांमध्ये देखील लसीकरण शिबिरे घेण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमक्या याच सेवेचा गौरव केला आहे. या संदर्भात पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशाने १७ जानेवारी २०२० पासून कोविडच्या प्रतिकारासाठी उपाययोजना सुरू केल्यात. तर १७ जुलै रोजी कोविडच्या लढ्यात एक महत्वाचा टप्पा पार पडला. या दिवशी देशातील लसीकरणाने २०० कोटींचा टप्पा पार केला. यात आरोग्य यंत्रणांसह देशातील अनेक संस्थांनी भरीव असे योगदान दिले असून यात जीएम फाऊंडेशनचा समावेश आहे. आजवर अनेक मान्यवरांनी जी. एम. फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक केले असून आता थेट पंतप्रधानांनीच पाठ थोपटल्याची बाब विशेष मानली जात आहे. आ. गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली अरविंद देशमुख आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आरोग्यसेवेचा हा अविरत वारसा कायम राखला आहे. याचीच पावती पंतप्रधानांनी दखल घेतल्यातून अधोरेखीत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जळगाव येथे कोविड व्हॅक्सिनेशन कॅम्पिंग करता आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद देशमुख यांच्यासोबत अमय राणे, पितांबर भावसार, शिवाजी पाटील, विशाल भोळे व होनाजी चव्हाण यांनी सहभाग नोंदविला होता. तर तर जामनेर तालुक्यात लसीकरणासाठी चंद्रकांत बावस्कर अतिष झालटे, डॉ प्रशांत भोंडे, दिपक तायडे, जितू पाटील, सुहास पाटील, नाना बाविस्कर, नाना वाणी, गोलू झालटे, श्रीराम महाजन,सुभाष पवार, कैलास पालवे यांनी सहकार्य केले.

Exit mobile version