Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधानांचे आज ‘झीरो बजेट’ शेतीवर मार्गदर्शन

नवी दिल्ली वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशातील शेतकरी आणि कृषी तंत्रज्ञांना ‘झीरो बजेट’ शेतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

गुजरातमध्ये सुरू असलेल्या नैसर्गिक आणि शून्य-बजेट शेतीवर सुरू असलेल्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशभरातील शेतकरी आणि शास्त्रज्ञांना संबोधित करणार आहेत. नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय तीन दिवसीय शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑनलाइन या प्रकारात संबोधीत करणार असून या कार्यक्रमात सुमारे ५,००० शेतकरी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

या परिषदेला संबोधीत करतांना पंतप्रधान मोदी हे सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत सहभागी होणार आहेत. यावेळी नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब केल्याने होणार्या फायद्यांविषयी शेतकर्‍यांना सर्व आवश्यक माहिती पुरविली जाईल. इतर पारंपारिक पद्धती जसे की मातीला बायोमासने आच्छादित करणे किंवा मातीला संपूर्ण वर्षभर हिरव्या आच्छादनाने झाकणे, अगदी कमी पाण्याच्या उपलब्धतेच्या परिस्थितीतही पहिल्या वर्षापासून सतत उत्पादकता सुरु करण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

Exit mobile version