Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नांद्रा येथे अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात विज्ञान व चित्रकला प्रदर्शन  

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील नांद्रा येथील दि. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ऑ. सोसायटी लि. शेंदुर्णी संचालित आचार्य गजाननराव गरुड फाउंडेशन संस्थेच्या वर्धापनदिननिमित्त अप्पासाहेब पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा येथे विज्ञान प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक सल्लागार समितिचे सदस्य तथा तंटा मुक्तीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी वसंतराव माधवराव पाटील, पोलिस पाटील किरण पाटील, पत्रकार राजेंद्र पाटील, कोमलसिंग नंदलाल पाटील (हडसन), रमेश गजमल पाटील (हडसन), गणेश वामन पाटील, अनुसया नामदेव पाटील, मुख्याध्यापक आर. एस. च़ौधरी आदि.यांनी विज्ञान व चित्रकला प्रदर्शन पाहणी केली. मुलांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.इयत्ता ५ वी ते १० विद्याथी यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.

विज्ञान शिक्षक एस. व्ही. शिन्दे, एल. एम. पाटील, व्ही. एस. पाटील, जे .डी .पाटील, आर. आर. बाविस्कर, अविनाश निकम, गजानन ठाकूर, चित्रकला शिक्षक ए. एन. बेले यांनी परिश्रम घेतले. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version