Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोलेंचे नाव आघाडीवर

मुंबई प्रतिनिधी । लवकरच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची नियुक्ती जाहीर होणार असून यात विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाल्यानंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबतही बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जागेसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार राजीव सातव, मंत्री विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आदी नावांची चर्चा सुरू आहे. यातील वडेट्टीवार यांनी तर दिल्ली दरबारी आपण इच्छुक असल्याचे सांगितले आहे. या पार्श्‍वभूमिवर, लवकरच प्रदेशाध्यक्ष बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

यात विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असून पक्षाचे नेते राहूल गांधी याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. पटोले हे ओबीसी समुदायातील असून अतिशय आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

Exit mobile version