Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नायगाव येथील नाल्याला आग; पाईप जळून खाक

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नायगावजवळील नाल्याला आज सकाळी ९ वाजता आग लागली. या आगीत नाल्यातून जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाइपलाइनचे मोठे नुकसान झाले आहे.

आग गावाजवळच असल्यामुळे आगीमुळे मोठे धोक्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र नागरिकांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली, हीच माहिती मुक्ताईनगर येथे तहसीलदारांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरणगाव फॅक्टरी येथील अग्निशामक दलाचे पाण्याचे बाम्बे याठिकाणी बोलावण्यात आले. आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज याठिकाणी वर्तवला जात आहे.

 

Exit mobile version