Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नगरदेवळा-बाळद रस्त्यावर रिक्षा पलटी; सहा जखमी

nagardevada apghat

पाचोरा (प्रतिनिधी)। मालेगाव येथुन पाथरी (जळगाव) कडे जाणार्‍या रिक्षा पलटी झाल्याने सहा प्रवासी जखमी झाले. यात तीन महीलांसह दोन लहान बालकांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज 1 मे 2019 दुपारी ३ वाजेच्या सुमारास मालेगाव येथुन कौटुंबिक कार्यक्रमासाठी जळगाव तालुक्यातील पाथरी गावाकडे येत असतांना रिक्षा मालकाचे घरचेच कुटुंब प्रवास करतांना नगरदेवळाकडुन पुलाजवळुन बाळदकडे वळताना अचानक खड्ड्यात रिक्षा गेल्याने पलटी होवुन झालेल्या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. यात अकीला अब्जल शेख (वय-४५), शकीलाबी शाहगिर अली (वय-४१) सलमाबी शेख भिकन (वय-३६), शेख भिकन शेख रशीद (वय-३८), इब्राहिम भिकन शेख (वय-८), तहसिन शेख भिकन (वय-१०) सर्व राहणार मालेगांव यांचा समावेश आहे. जखमींना तातडीने खाजगी अॅब्लुलन्स आणि १०८ अ‍ॅम्ब्युलन्स ने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

यावेळी कॉग्रेस आयचे सचिन सोमवंशी, निलु पाटील, बबलु मराठे, प्रशांत सोमवंशी यांनी अपघातील जखमींना उपचारासाठी मदत कार्य केले. तर डॉ. भुषण मगर, डॉ. संदीप इंगळे, डॉ. प्रवीण देशमुख, डॉ. अक्षय धनगर, डॉ. कावेरी पाटील, डॉ. सचिन वाघ सह हॉस्पिटलचे कर्मचारी नाना सोनवणे, गिता महाजन, हिरामन पाटिल, प्रताप पाटील, किरण पाटील यांनी उपचार तातडीने सुरू केले आहे. यात एकाची प्रकृती गंभीर आहे. पोलीसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यात मात्र अपघातग्रस्त रिक्षाचे नुकसान झाले आहे.

Exit mobile version