Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘नाफेड’चे कांदा खरेदी केंद्र जळगाव जिल्ह्यात सुरू करावे – दुसखेडा शेतकऱ्यांची मागणी

पाचोरा, प्रतिनिधी | ‘नाफेड’चे कांदा खरेदी केंद्र जळगाव जिल्ह्यात सुरू करावे यासाठी दुसखेडा शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.

“महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसखेडा येथील शेतकरी यांनी बाजर स्थिरीकरण योजनेअंतर्गत दरवर्षी नाफेड कडून कांदा खरेदी केली जाते. परंतु जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाफेडच्या कांदा खरेदी बाबतीत योग्य ती माहिती मिळत नसल्याने कांदा विक्रीमध्ये अडचणी येत असतात.

यावर्षी मे, जूनमध्ये नाफेडची कांदा खरेदी केली जाईल. त्या वेळेस जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचाही कांदा नाफेडने खरेदी करावा यासाठी आपण नाफेड व केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करावा व शेतकऱ्यांच्या कांदा पिकाला योग्य भाव मिळवून द्यावा” या बाबतचे निवेदन जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांना देण्यात आले.

खासदार उन्मेश पाटील हे गिरणा परीक्रमेच्या दुसऱ्या टप्प्याप्रसंगी तालुक्यातील दुसखेडा येथे आले असतांना याबाबतचे निवेदन शेतकरी मनोज पाटील, डी. एस. पाटील, प्रकाश महाजन, यशवंत महाजन, नितीन महाजन, गणेश पाटील, सरपंच मनोज पाटील, उपसरपंच संजय भिल्ल व सर्व शेतकरी बांधव यांनी दिले.

Exit mobile version