Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाचणखेडा आठवडे बाजारातून एकाचे दोन मोबाईल लांबविले

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे बाजारात आलेल्या एका व्यक्तीचे १३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष तुकाराम चौधरी (वय-४५) रा. नाचणखेडा ता. जामनेर हे गावातील आठवडे बाजारात भाजीपाला घेण्यासाठी दुपारी ४.३० वाजता आले होते. त्यावेळी त्यांच्या खिशात असलेले १३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. प्रदीप चौधरी करीत आहे.

Exit mobile version