Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात आजपासून नामजप साधना शिबीर (व्हिडीओ)

raver 3

रावेर प्रतिनिधी । भक्ति, ज्ञान तथा प्रेमावतार व अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे प्रणेते आणि वृन्दावन धाम आश्रमाचे संस्थापक परम पूज्य सदगुरु संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या १०व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आजपासून (दि.23) सुरु होणाऱ्या तीन दिवसीय नामजप साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आज या कार्यक्रमात हजारो साधकांसह शेकडो संत, महन्त, महामंडलेश्वर यांची देखील उपस्थिती राहणार असून यामध्ये सतपंथ फैजपुरचे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरि महाराज, स्वामी नारायण गुरुकुल सावदा येथील महंत भक्तिप्रसाद शास्री महाराज, महानुभाव सावदा येथील संत मानकर बाबा शास्री, दत्त आश्रम डोंगरदेचे स्वामी स्वरूपानंद महाराज, बुरहानपुर येथील संत सरसपुरी महाराज, राम मंदिर कुसुंबाचे महन्त भरतदास महाराज, मध्यप्रदेश खलघाट धामनोदचे महंत कृष्णदास महाराज, नंदुरबार प्रकाशा येथील साध्वी कमल माताजी, कैलाश धाम झिरन्या (म.प्र)चे महन्त राघवानंद भारती जी महाराज, साबरपाट जिन्सीचे महंत गणेश गिरी महाराज, चाळीसगांव येथील संत विशुद्धानद शास्री महाराज, रामदेवबाबा मंदिर भगवान पूरा (म.प्र) येथील महंत रामदास त्यागी महाराज, हनुमान आश्रम सतवाड़ा (म.प्र) येथील महंत संतोष दास महाराज, शक्तिधाम मारूगढ़चे विष्णु महाराज आदि संतांची पावन उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा
सातपुडयाच्या कुशीत वसलेले रावेर तालुक्यातील पाल या आदिवासी परिसरात परम पूज्य सदगुरु संत लक्ष्मण चैतन्य बापूजी नी ज्ञान, भक्ति, तथा प्रेमाची अविरत गंगा वाहून देशभरातील साधक या ज्ञान गंगेत डुबकी लावत भवसिंधु पार करित असून नियतिच्या आदेशाचे पालन करित दि.२५ डिसेंबर २००९ साली ब्रम्हलीनास समाधिस्त झाले. तेव्हा पासून पुज्य बापूच्या पुण्यतिथि महोसत्वाचे अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारातर्फे भव्य आयोजन करण्यात येते. या तीन दिवसीय नामजप साधना शिबिरासोबत राजस्थानी कलाकृतिने सज्य भव्य हरिधाम मंदिर वर्धापन दिवस, पुज्य बापूजीचे गुरुवर्य सदगुरु संत महादेव चैतन्य उर्फ (दगडूजी) बापू जयंती आणि शेवटी दि.२५ डिसेंबर रोजी सदगुरु परम पूज्य संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांची पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत असून या दिवशी सकाळी ५ वाजेला पुज्य बापूजी समाधि दर्शन तसेच महाआरती, पादुका पूजन, त्यानंतर गुरुदीक्षा, व सकाळी ०९:३० पासून आलेल्या संताचे श्रद्धावचन आणि पुज्य बापूचे कृपापात्र शिष्य विद्यमान गादीपती श्रद्धेय संत गोपाल चैतन्य महाराज यांच्या रसाळ अमृत वाणीतून सत्संग अमृताचा लाभ होणार आहे.

यांनी केले आवाहन
महाप्रसादानंतर या महोत्सवाची सांगता करण्यात येणार असून या कार्यक्रमाकरिता पोलिस प्रशासन, महावितरण, आरोग्य विभाग, आगार प्रमुख यांना सज्ज ते करिता निवेदन देण्यात आलेले असून आश्रमात भविकाच्या व्यवस्थेकरिता सत्संग पंडाल, निवास, भोजन, स्नान आदिची तयारीला साधकातर्फे सुरुवात करण्यात आलेली असून या महोत्सवासाठी आपन सर्व सादर आमंत्रित असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चैतन्य साधक परिवार रावेर तालुका समितितर्फे करण्यात आलेले आहे.

Exit mobile version