Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

“ना जितने की खुशी ना हारने का गम”… निशा जैन यांनी वाढवला खेळाडूंचा उत्साह

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी खेळाच्या सुरुवातीला अनुभूती निवासी शाळेच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी स्पर्धक खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “ना जितने की खुशी ना हारने का गम, तुम ये खेल रहे हो ये क्या है कम” अशा शायराना अंदाजात सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवला.

सौ. निशा जैन पुढे म्हणाल्या की, ‘तुमची ऊर्जा आणि जिद्द पाहून मन प्रसन्न होत आहे आपले मन एकाग्र करून खेळा.’ असे सांगत सर्व खेळाडूंना शुभेच्छाही त्यांनी दिल्या. तत्पूर्वी सकाळी सर्व खेळाडूंची व त्यांच्या पालकांची स्पर्धेच्या ठिकाणी लगबग सुरू होती. काहींना आपल्या प्रतिस्पर्ध्याबाबत उत्कंठता व खेळाची रणनीतीची आखणी यावर चर्चा सुरू होती. अनुभूती स्कूलच्या क्रीडानुभूती या खेळाचा परिसरातील श्रद्धेय भवरलाल जैन यांनी म्हटलेल्या “खेळ म्हणजे निव्वळ शारीरिक व्यायाम नव्हे; ते तर तुमच्यात स्पर्धेचा जोश भरतात” या वाक्याला या साऱ्याचित्रामुळे स्पर्धकांसह पालकांमध्ये असलेला उत्साह व आनंद दिसून येत होता. खेळाडू मग्न होऊन आपल्या खेळात एकाग्र झालेले, व पालक बाहेर त्यांच्या मुलांच्या प्रतीक्षेत.

असे आहेत स्पर्धेचे नियम…

खेळाडूंनी टेबलावर 30 मिनिटं आधी येणे आवश्यक, त्याआधी सर्व स्पर्धकांना फेयर प्ले च्या प्रक्रियेतून जावं लागते. यामध्ये सर्व स्पर्धकांची स्कॅनर च्या माध्यमातून तपासणी केली जाते. स्पर्धकांना कुठल्याही प्रकारचे मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, स्वतःचे पेन, टोपी ई. साहित्य नेण्यास सक्त मनाई असते. जर कुणाकडे अश्या गोष्टी खेळादरम्यान आढळून आल्या तर मुख्य ऑरबिटर त्यांच्यावर कारवाई करू शकतात. ज्यामुळे खेळाडूंना तत्काळ खेळ सोडावा लागतो व मुख्य ऑरबिटर खेळाडूला संपूर्ण स्पर्धेतून बादही करू शकतात.

दुसऱ्या फेरीत पश्चिम बंगालच्या मृत्तिका ची घोड्याची चाल चुकली…

दुसऱ्या फेरीमध्ये मुलींच्या गटात अग्रमानांकित पश्चिम बंगाल ची मृत्तिका मल्लिक ने रोमहर्षक सामन्यात केरळ च्या आदिती अरुण चा पराभव केला. मृत्तिका ची घोड्याची चाल चुकल्यामुळे आदितीच्या हत्तीने सी-३ जागेवर मुसंडी मार फ-३ जागेवर बलिदान देऊन पांढरी बाजू खिळखिळी केली,  वजिराच्या सुंदर चाली रचत डाव तिच्या बाजूने झुकला होता पण मृत्तिका ने अनुभवाचा फायदा घेत बाजी पलटवली व आपले अग्रस्थान शाबूत ठेवले. शुभी गुप्ता, साची जैन, स्नेहा हळदर, अर्शिया दास, राजण्या दत्ता, सपर्या घोष आदी मानांकित खेळाडूंनी सहज विजय नोंदवले. खुल्या गटात कँडीडेट मास्टर मयंक चक्रवती ने स्नेहल रॉय चा धुव्वा उडविला तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पटावर शेख सुमेर मुहम्मद इम्रान ने सहज विजय प्राप्त केला. पण चवथ्या पटावर तामिळनाडू च्या यशवंतने बरोबरीत रोखले.

Exit mobile version