Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ना. गुलाबरावांचे जळगावात जल्लोषात स्वागत !

gulabrav patil 11

जळगाव, प्रतिनिधी | येथील जळगाव ग्रामीण मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना नुकतीच राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. मंत्रिमंडळात समावेशानंतर आज (दि.१) प्रथमच ना. गुलाबरावांचे जळगावात आगमन झाले. त्यांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत केले.

 

मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आल्यानंतर त्यांची गावातून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीने जाताना त्यांनी स्टेशनजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर स्टेशन चौकात पंडित नेहरू यांच्या पुतळ्यालाही माल्यार्पण करून नमन केले तर कोर्ट चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ते नतमस्तक झाले. त्यानंतर ते शासकीय विश्राम गृहाकडे रवाना झाले.

 

 

Exit mobile version