Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव येथील न.पा. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना हेल्थ किटचे वाटप

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । वसुंधरा फाऊंडेशनतर्फे आज (दि.८) रोजी सकाळी १० वाजता २०० विद्यार्थ्यांना हेल्थ किटचे वाटप नगरपालिका मराठी शाळा क्रमांक क्र.१६ घाट रोड, चाळीसगाव येथे करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून कोविड प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येत असल्याने शाळा सुरू झाल्या आहेत.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुंधरा फाऊंडेशनचे देवेन पाटील  होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, केमिस्ट महाराष्ट्र असोसिएशनचे सदस्य प्रदीप देशमुख तर  प्रगत संस्थेंचे अध्यक्ष खुशाल पाटील अदि उपस्थित होते. २००  विद्यार्थ्यांना वसुंधरा फाऊंडेशनच्या वतीने घाट रोड स्थित न. पा. मराठी शाळा क्र १६ येथे दि ८ रोजी सकाळी १० वाजता  आरोग्य किट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार बोलताना म्हणाले की, इंग्लिश मेडीयमकडे प्रवेश घेण्यास पालकांचा कल जास्त असताना नगर परीषदेच्या मराठी शाळेची परीस्थिती बिकट असून ही विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवून ठेवण्याचे कौशल्य शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक करीत आहे. मराठी शाळेत   विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देवून घडविण्यासाठी अथक प्रयत्न शिक्षक करत असल्याने त्यांचे कौतुक केले. वसुंधरा फाउंडेशन अध्यक्षा धरती पवार व सचिन पवार यांनी सामाजिक भान जोपासत आपल्या दातृत्वातुन शाळेला आरोग्य किट सुपूर्द केल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला हॅण्ड वॉश, टूथ पेस्ट, टूथ ब्रश, आंघोळीचा साबण व मास्क वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान दिसून आले असल्याचे सांगितले.

केमिस्ट महाराष्ट्र असोसिएशनचे सदस्य प्रदीप देशमुख म्हणाले की, वसुंधरा फाउंडेशन अध्यक्षा धरती पवार व सचिन पवार यांनी न. पा. शाळा क्र. १६ येथे विद्यार्थ्यांना आरोग्य किट देवून खऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना मदत केली आहे. वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षांपासून नगरपरिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दिपावलीच्या निमीत्ताने दीपोत्सव साजरा करत विद्यार्थ्यांना मिठाई आणि भेटवस्तू देवून विद्यार्थ्यांची दिवाळी गोड केली आहे.

शाळेतील उपस्थिती वाढवण्यासाठी उपक्रम घेवून हातभार लावला असल्याने त्यांचे कौतुक केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर शिंदे यांनी बोलताना सांगितले की, न. पा. मराठी शाळेना समाजातील दातृत्वान व्यक्तीनी दत्तक घेतल्यास गोरगरीब विद्यार्थ्यांना घडविण्यास हातभार लागणार असल्याचे सांगितले.

यावेळी मुख्याध्यापक श्रीमती प्रतिभा पाटील, शिक्षक ज्ञानेश साळुंखे, सुजित साळुंखे, निवृत्ती उंबरकर, कैलास पाटील, अविनाश चव्हाण, दिनेश पचलुरे, श्रीमती राखी ठोके अदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन धरती पवार, अध्यक्ष वसुंधरा फाऊंडेशन, सुनील भामरे, रविराज परदेशी, धर्मराज खैरनार, सचिन पवार यांनी परीश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पेटे यांनी केले. आभार शिक्षक नितीन राठोड यांनी मानले.

 

Exit mobile version