Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माझी वसुंधरा अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद

एरंडोल प्रतिनिधी । नगर पालिकेतर्फे पोलीस कवायत मैदान एरंडोल येथे जितेंद्र इलेक्ट्रिक कंपनीचे ई वेहीकल प्रदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. 

प्रदर्शनाचे उद्घाटन श्री रमेश सिंग परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून अर्चना खेतमाळीस तहसीलदार, ज्ञानेश्वर जाधव पोलीस इन्स्पेक्टर, डॉ.नरेंद्र ठाकूर नगरसेवक, डॉ.नरेंद्र पाटील, किरण देशमुख, संजय धमाल, शिंदे, पंचबुधे उपस्थित होते. प्रदर्शनामधे ई वेहीकल ची सखोल माहिती महाराष्ट्रचे राज्य सेल्स मॅनेजर उज्वल पाटील, प्रतीक नागरे सेल्स प्रतिनिधी, किशोर पाटील अधिकृत डीलर जळगांव यांनी दिली. ई वेहीकल ही संपूर्ण पर्यावरण पूरक,ध्वनी प्रदुषण मुक्त,वापरण्यास हलके,ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच महिलांसाठी  फायद्याचे असल्याचे दिसत आहे.पेट्रोल गाडीच्या तुलनेत सरासरी 30 रू. मधे ई- वाहन 120 किमी पेक्षा जास्त चालत आहे.त्यामुळे वाहन धारकांची आर्थिक बाजू वर परिणाम होणार नाही.

तसेच गाडी ला उन वारा पाऊस आल्यास त्याचां गाडीवर परिणाम होणार नाही. सदर गाडीचे अधिकृत डीलर जळगांव येथे पूर्वा मोटार यांच्या कडे आहे. काही गाड्यांना 3 वर्ष गॅरंटी असल्याने सर्व दुरस्ती  पूर्वा मोटार याचे राहील.3 तास चार्जिंग मधे 90 किमी चालत असल्याने फायदेशीर आहे.एका चार्जिग च्या वेळी 1 ते 2 युनिट फिरत असल्याने पेट्रोल खर्चात कमालीची बचत होईल.तसेच गाडीचा स्पीड कमी असल्याने दुर्घटना कमी घडेल असे नगराध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Exit mobile version