Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात निवडणुक आयोगाच्या वतीने मतदार जनजागृती स्पर्धा; सहभागाचे आवाहन

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील निवडणूक आयोगाच्या वतीने ‘माझे मत, माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे.

तेव्हा या स्पर्धेसंदर्भात मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागामार्फत जनजागृती केली जात आहे. दिनांक १५ मार्च पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत लोखोंची बक्षीसे जाहिर करण्यात आली आहे. यात हौशी, व्यावसायीक व संस्थात्मक सहभाग घेता येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जनजागृती साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये “माझे मत माझे भविष्य, एका मताचे समर्थ” या विषयावर प्रश्नमंजूषा स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा, भिंती चित्र स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. या स्पर्धेमध्ये हौशी, व्यवसायिक व संस्थात्मक सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यात उत्कृष्ट बक्षीस देखील असून या सर्व स्पर्धामध्ये विभागनिहाय यात संस्थात्मक व्हिडीओ मेकींग प्रथम बक्षीस २ लाख रूपये, व्दितीय बक्षीस १ लाख रूपये, तृतिय बक्षीस ७५ हजार तर विशेष उल्लेखनिय बक्षीस ३० हजार आहे तसेच गित स्पर्धा सह इतर विविध स्पर्धेत प्रथम बक्षीस एक लाख, दुसरे ५० हजार, तिसरे बक्षीस ३० हजार तर विशेष उल्लेखनीय १५ हजार आहे असे हे बक्षीस आहेत. या स्पर्धेत प्रवेशिका १५ मार्चपर्यंत असून अधिक माहितीसाठी मुक्ताईनगर येथील निवडणूक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार श्वेता संचेती, निवडणूक नायब तहसीलदार प्रदीप झांबरे आदींनी केले आहे. तर या स्पर्धे संदर्भात जनजागृतीचे पोस्टर,स्टीकर निवडणुक विभागाकडून विविध ठिकाणी लावण्यात येत आहे.

शार्टफिल्म निर्मात्यांना संधी

तालुक्यात विविध गावात शार्ट फिल्म अर्थात लघुपट निर्माते आहेत. ते विविध पातळीवरील विषय घेवुन लघुपट निर्माण करत आहे. तेव्हा त्यांना मतदर जणजागृती या राष्ट्रीय विषयावर लघुपट निर्माणची संधी आहे. याचा लाभ घ्यावा, श्वेता संचेती, तहसिलदार मुक्ताईनगर, प्रदीप झांबरे नायब तहसीलदार मुक्ताईनगर असे आवाहन यांनी केले आहे.

Exit mobile version