Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांनी केले सामूहिक नमाज पठण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी गुरूवार ११ एप्रिल रोजी सकाळी भुसावळ शहरातील ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पहायला मिळाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणजे रमजान ईद या निमित्त गुरूवार ११ एप्रिल रोजी सकाळी भुसावळ शहरासह तालुक्यातील ठिकठिकाणी सामूहिक नजाज पठण करण्यात आले. या अनुषंगाने भुसावळ शहरातील ईदगाह मैदानात भुसावळ शहरातील मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत सकाळी सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी सामूहिक नमाज पठणानंतर मुस्लिम धर्मगुरू यांच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करत मतदानाविषयी जनजागृती करण्यात आल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर मुस्लिम समाज बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version