Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावदा येथे भर दिवसा एकाचा निर्घृण खून

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । शहरात भर दिवसा एका प्रौढ व्यक्तीचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा येथील ख्वाजा नगर परिसरात आज सायंकाळी तिघा अज्ञात इसमांनी रईस दिलदार चौधरी उर्फ रईस दंगा (५०) या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला चढवून त्याचा खून केल्याची घटना घडली. सावद्यात भर दिवसा खून झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मरिमाता मंदिर परिसरातील या घटनेला पूर्व वैमनस्याची किनार असावी असा प्राथमिक अंदाज आहे. मयत हा मध्य प्रदेशातील लालबाग गुलाबगंज येथील मुळ रहिवासी असून तो गेल्या काही महिन्यापासून सावदा येथे वास्तव्यास होता. पुढील तपास सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक राहुल वाघ व त्यांचे सहकारी तपास करत आहेत.

दरम्यान, रईस चौधरी याच्यावर तीन जणांनी प्राणघातक हल्ला चढविल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version