Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गौरी लंकेश यांच्या खुन्याला अटक

arrested 765389

धनबाद वृत्तसंस्था । प्रख्यात कन्नड पत्रकार तथा विचारवंत गौरी लंकेश यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी असणारा ऋषीकेश देवडीकर याला बिहारच्या धनबादमधून अटक करण्यात आली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात आधीच आरोपींना अटक करण्यात आली असली तरी मुख्य सूत्रधार ऋषीकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४) हा मात्र हाती लागत नव्हता. खून केल्यानंतर धनबाद जिल्ह्यातील कतरास येथे तो नाव व ओळख बदलून राहत होता. मात्र एसआयटीने त्याला बरोबर हुडकून काढत गुरूवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्याच्या अटकेमुळे आता या प्रकरणाचे रहस्योदघाटन होणार आहे.

Exit mobile version