Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

औद्योगीक वसाहतीत तरूणाची हत्या

murder

जळगाव प्रतिनिधी । शहरातील औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकाच्या हद्दीत आज पहाटे एका तरूणावर काही जणांनी केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, शरद विठ्ठल कोळी ( वय ३१ रा. रामपेठ, जुने जळगाव) हा रात्री जेवण करून औद्योजिक वसाहतीमधील पॅराडाईज कंझुमर प्रॉडक्ट या कंपनी समोरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जखमी केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संबंधीत कंपनीच्या शिपायाने या घटनेबाबत माहिती पोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक श्री. वाठोरे यांनी पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version