Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पती-पत्नीतील भांडण सोडायला गेलेल्या तरूणाचा खून

जळगाव प्रतिनिधी । पती व पत्नीमध्ये सुरू असणारे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाचा खून झाल्याची घटना रात्री घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सप्तश्रुंगी कॉलनीत योगेश ज्ञानदेव जंगले (वय ३७, रा. सप्तशृंगी कॉलनी, मूळ रा. साळवा-नांदेड, ता.धरणगाव) हा तरूण राहतो. रात्री दहाच्या सुमारास योगेश हा घरी असतांना थोड्या अंतरावर असणार्‍या घरातील गणेश सखाराम भंडारे व त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण सुरू असल्याचे त्याला दिसून आले. यामुळे तो भांडण सोडविण्यासाठी गेला. यावेळी योगेशला आल्याचे पाहून संतापलेल्या गणेश भंडारे याने धारदार हत्याराने योगेशवर सपासप वार केले. यामुळे जीव वाचवण्यासाठी पळ काढणारा योगेश थोड्या अंतरावर कोसळून तेथेच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर गणेश भंडारे आणि त्याचे कुटुंब फरार झाले आहे. भंडारे हा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन व एमआयडीसी पोलिस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होतेे.

Exit mobile version