Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जम्मू-काश्मिरात पोलीस महासंचालकांची हत्या

श्रीनगर-वृत्तसंस्था | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौर्‍याआधीच जम्मू-काश्मिरचे पोलीस महासंचालक (कारागृह) हेमंत लोहिया यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

हेमंत लोहिया या वरिष्ठ आयपीएस अधिकार्‍याची हत्या झाल्याने जम्मू-काश्मीर हादरला आहे. रात्री उशीरा द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेने त्यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आजपासून जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावर असून याआधीच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची क्रूर हत्या झाल्याने परिसह हादरला आहे.

दरम्यान, हेमंत लोहिया हे आपल्या मित्राच्या घरात राहत होता. याच घरातच त्यांची हत्या करण्यात आली. घरातील नोकराने लोहिया यांचा खून केला असण्याची शंका व्यक्त केली जातेय. संशयास्पद अवस्थेत त्यांचा मृतदेह घरात आढळून आला होता. मुख्य संशयित आरोपी असलेला नोकर सध्या फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. हेमंत लोहिया हे १९९२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होती. अलीकडेच त्यांनी कारागृह महासंचालक म्हणजेच डीजी जेल या पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. दरम्यान, त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Exit mobile version