Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैसे दिले नाही म्हणून नशेखोरांकडून मित्राचा खून

औरंगाबाद (वृत्तसंस्था) नशेच्या गोळ्या घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दोन मित्रांनी मिळून एका मित्राच्या पोटात चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेतील पाडेगाव कासम्बरीनगर भागात घडली आहे.

सय्यद शाकेर अली सय्यद नासेर अली(25, रा. रा. कासबंरी दर्गा, पडेगांव ), शेख दाऊद ऊर्फ शाहरुख पिता नजमोद्यीन आणि त्याचा भाऊ सय्यद शहजाद अली सय्यद नासेर अली असे आरोपींची नावे आहेत. शाकेर व जमीर यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. सोमवारी तिघांनी सय्यदला कासंबरी दर्गा परिसरात बोलावले. तिथे त्यांनी त्याला नशेच्या गोळ्या घेण्यासाठी पैशांची मागणी केली. पण, त्याने नकार दिला. त्यातून वाद झाला व तिघांनी त्याच्या मांडी आणि पोटात चाकू भोसकला. त्याला काही वेळाने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version