Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील मर्डर : दोन अटकेत; इतरांचा शोध सुरू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मु.जे. महाविद्यालयात तरूणाचा खून केल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून इतरांचा कसून शोध सुरू आहे.

याबाबत वृत्त असे की, एम.जे. कॉलेजमध्ये आसोदा येथील मुकेश मधुकर सपकाळे (वय २१) या तरूणाचा शनिवारी खून करण्यात आला. किरकोळ कारणावरून करण्यात आलेल्या या क्रूर हत्येमुळे प्रचंड खळबळ उडाली असून शैक्षणिक परिसरातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या भयंकर घटनेनंतर पोलिसांनी कॉलेजच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीचे फुटेज तपासून यातील आरोपींची ओळख पटविली. यातील इच्छाराम वाघोदे या संशयिताला पारोळा येथून अटक करण्यात आली असून एकाला जळगावातून ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतरांचा कसून शोध सुरू आहे. दरम्यान, रात्री उशीरा मृत मुकेश सपकाळे याचे शवविच्छेदन करण्यात आले.

Exit mobile version