Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात पुन्हा मर्डर : तरूणाची हत्या

murder

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोंबडी बाजाराजवळ रात्री एका तरूणाचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली असून आज पहाटे ही घटना उघडकीस आली.

याबाबत वृत्त असे की, आज सकाळी जेएमपी मार्केटमध्ये एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यात कोंबडी बाजाराजवळ असणार्‍या एका दुकानाजवळ या तरूणाची इतरांशी झटापट झाल्याचे दिसून आले. येथून काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मृतदेहावरील खुणा बघता त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी पोलिसात नुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version