Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील खूनाला अनैतिक सबंधाची किनार : एकाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील समता नगर भागातील तरूणाचा खून हा अनैतिक संबंधाच्या प्रकारातून झाला असून यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील समता नगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सागर नरेंद्र पवार ( वय २८) या तरूणावर रात्री उशीरा धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने पहाटे त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

सागर नरेंद्र पवार हा तरूण समता नगरात एकटाच राहत होता. रात्री उशीरा त्याच्यावर एकाने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या सागराला पहिल्यांदा जिल्हा रूग्णालय आणि नंतर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना त्याने शेवटचा श्‍वास घेतला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अमित खरे (वय३३) या तरूणाला ताब्यात घेतले आहे. मयत सागरचे अमितच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याने याची कुणकुण अमितला लागल्याने यातूनच त्याने सागरला संपविल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशीस प्रारंभ केला आहे.

सागरच्या मृतदेहावर जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत असून येथे त्याच्या आप्तांनी केलेल्या आक्रोशाने वातावरण गंभीर बनले. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Exit mobile version