Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड येथे प्रेमसंबंधातून तृतीयपंथीचा खून

बोदवड प्रतिनिधी | तालुक्यातील उजनी जवळील सोनोटी शिवारात प्रेमसंबंधातून तृतीयपंथीचा खून केल्याची घटना घडली असून याबाबत बोदवड पोलिसात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी तृतीयपंथी चंदा उर्फ कैलास व संशयित आरोपी संदीप कैलास साळुंखे, आकाश जयवंत सोनवणे, अतुल हिरालाल धनगर, राहुल विष्णू ठाकरे सर्व रा. आडावड ता. चोपडा हे पाचही जण बोदवड तालुक्यातील उजनी दर्गा येथे पाया पाडण्यासाठी आले होते. त्यामधील आरोपी संदीप साळुंखे व तृतीयपंथी चंदा या दोघांमध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. संदीपचे लग्न झालेले होते व त्याने दोन मुले, पत्नी याना सोडून माझ्या सोबत राहा असे नेहमी वारंवार म्हणत होता. त्यामुळे चांदाला संपवण्याचा इराद्याने उजनी दर्गा येथे आले होते. आरोपी संदीप कैलास साळुंखे व त्याचे तीन साथीदार यांनी तृतीपंथी चंदा उर्फ कैलास याचा गळा आवरून चेहऱ्यावर गळ्यावर चाकूने भोसकून सोनोटी शेती शिवारातील रेल्वे पुलाजवळील तलावाजवळ खून केला. खून करणाऱ्या चारही संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. फिर्यादी चे नाव गुपित ठेवण्यात आलेले असून 4 जणांविरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील खरे व गोपाळ गव्हाळ करीत आले

Exit mobile version