Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महापालिका कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रिधूरवाडा परिसरातून महानगरपालिकेचे कर्मचाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता उघडकीला आली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर डिगंबर सपकाळे (वय-५०) रा. रिधूरवाडा, शनीपेठ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून जळगाव महापालिकेत नोकरीला आहे. सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांची मालकीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीई ५८१६) ही घरासमोर पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचे मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता उघडकीला आली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश जाधव करीत आहे.

Exit mobile version