Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  मुंबईतील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी संप आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे ओपीडी रूग्णांवर उपचार मिळण्यास अडचणी येणार असून रुग्णांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहेत.

सोमवारी आठवड्याचा पहिलाच दिवस असताना रुग्णालयात गर्दी असताना जे.जे.च्या निवासी डॉक्टरांनी अचानक काम बंद आंदोलन सुरु केल्याने त्याचा फटका हजारो रुग्णांना बसणार आहे. त्यामुळे ओपीडीतील रुग्णांना उपचार मिळण्यास अडचणी येणार आहेत. या मुंबईतील जे.जे.रुग्णालयात सर्वाधिक ओपीडीची ( बाह्य रुग्ण विभाग ) संख्या असते. जे.जे. रुग्णालयातील त्वचा विभागातील निवासी डॉक्टरांनी सामुहिक रजा आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे रुग्णांना अडचणीला सामोरे जावे लागू शकते.

जे.जे.रुग्णालयातील त्वचा विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण कुरा यांच्या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून निवासी डॉक्टरांनी संप सुरु केला आहे. रुग्णांचे मृत्यू , निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ, नापास करण्याची धमकी, सहकारी डॉक्टरांचा सल्ला नाकारणे आणि विभागप्रमुखांकडून सातत्याने होणारा त्रास अशा विविध कारणांमुळे जे.जे. रुग्णालयातील त्वचा विभागाच्या निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version