फोन टॅपींग प्रकरणी चौकशीसाठी रश्मी शुक्ला यांना समन्स

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे.
शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबईतील सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले. रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स धाडण्यात आले. बुधवार 28 एप्रिल रोजी जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना सांगण्यात आले आहे. सायबर सेलचे तपास पथक दिल्लीलाही गेले असल्याची माहिती माहिती आहे.

Protected Content