Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दसरा मेळव्यासाठी मुंबई पोलीस प्रशासन सज्ज

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा होणारा मेळावा लक्षात घेता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कायदा आणि सुव्यवस्था राहिल याची काळजी घेतली आहे. त्यासाठी पोलिसांनी ६ अपर आयुक्त, १६ पोलीस उपायुक्त, ४५ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह २४९३ पोलीस अधिकारी आणि १२ हजार ४४९ पोलीस अंमलदार बंदोबस्तसाठी तैनात करण्यात आलेले आहेत.

मंगळवारी बृहन्मुंबई शहरामध्ये आझाद मैदान आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आझाद मैदान या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. तर शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाची तोफ धडाडणार आहे. हे दोन्ही मोठे मेळावे लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

या दोन मेळाव्यांव्यतिरिक्त मंगळवारी देवी विसर्जन आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा वानखेडे स्टेडियम येथील सामना आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई,  विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.

Exit mobile version