Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मूळजी जेठा महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन मेस्ट्रो स्पर्धा उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । येथील मूळजी जेठा (स्वायत्त)महाविद्यालय,वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतर्फे ऑनलाइन स्पर्धा मेस्ट्रो २०२०-२१ चे आयोजन आज मंगळवार 8 डिसेंबर रोजी करण्यात आले. 

या स्पर्धेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. आर चिरमाडे, प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील विवेक कॉलेजच्या प्राचार्या. डॉ. विजया शेट्टी, मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.ना.भारंबे, वाणिज्य विद्या शाखा प्रमुख डॉ. ए. पी. सरोदे, स्पर्धा आयोजिका डॉ. संगीता पाटील, वाय.ए. सैंदाणे, डॉ. के. पी. नंदनवार, प्रा.एस.पी. पालवे, ए.के. आरसीवाला उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विद्याशाखा प्रमुख डॉ. ए.पी.सरोदे यांनी केले.  या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या विजया शेट्टी यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी स्पर्धा महत्त्वाच्या असतात त्यामुळे उत्साह वाढतो आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जस्मीन गाजरे यांनी तर आभार प्रदर्शन सी.ए ए.के आरसीवाला यांनी केले.

या ऑनलाईन स्पर्धेत पोस्टर मेकिंग,जाहिरात विकास, प्रश्नमंजुषा आणि पावर पॉइंट सादरीकरण या प्रकारांचा समावेश होता. आजची covid-19 ची परिस्थिती असताना देखील धुळे, नंदुरबार,बुलढाणा,जळगाव नाशिक इत्यादी विभागातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सक्रिय सहभाग नोंदविला.

मेस्ट्रो 2020- 21 पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रशांत वारके सर उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणामध्ये स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपले उत्पादन विक्री करण्यासाठी नैतिकतेने सामोरे जावे तसेच आयुष्यात अपयशाला खचून न जाता धैर्याने सामोरे जावे असे प्रतिपादन केले. तर बक्षीस वितरण समारंभाचे आभार डॉ.पी. एम जोशी यांनी केले. 

या ऑनलाईन स्पर्धेच्या पारितोषिकामध्ये जाहिरात विकास या स्पर्धेत प्रथम-नम्रता शिवाजी ठाकूर, अथर्व दीपक देशपांडे, सुहासिनी सुशील जैन बी.पी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव. पीपीटी स्पर्धेत प्रथम- सर्वेश नरेश बाविस्कर मू.जे. (स्वायत्त) महाविद्यालय जळगाव. द्वितीय- महेक देवेंद्र जयस्वाल मू.जे. (स्वायत्त)महाविद्यालय जळगाव. तृतीय-तेजस्विनी रवींद्र माळी आय.एम.आर.डी कॉलेज. शिरपूर प्रश्नमंजुषा ऑनलाइन स्पर्धेत प्रथम- अनुज पुरुषोत्तम महाजन के. सी. इ.एस, आय. एम.आर. कॉलेज,जळगाव.द्वितीय-सुहास सुशील जैन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव.तृतीय- साक्षी पंकज चौधरी मू.जे. (स्वायत्त)महाविद्यालय जळगाव. पोस्टर मेकिंग स्पर्धेत प्रथम-सुहासी सुनील जैन कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चाळीसगाव. द्वितीय-इंसिया मुर्तुजा बोहरी आय. एम.आर.कॉलेज, जळगाव. तृतीय- निकिता श्यामसुंदर शर्मा इत्यादी विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविली.

 

Exit mobile version